
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री 'आशा' सिनेमामुळे चर्चेत आहे. रिंकू हिने मोठ्या पडद्यावर आशा सेविकांची व्यथा मांडली आहे. प्रेक्षकांनी देखील 'आशा' सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे.

रिंकू सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता देखील रिंकू हिची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये रिंकू हिने तिच्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

रिंकूने एक व्हायरल पोस्ट शेअर केली. ज्यात असं लिहिलं आहे की, 'मला माझी झोप आवडते आणि माझ्या झोपेला मी... पण माझ्या कुटुंबियांना माझं हे नातं आवडत नाही...', अशात रिंकू हिच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगू लागल्या.

सांगायचं झालं तर, अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर रिंकू हिचं नातं अनेकांसोबत जोडण्यात आलं. तर स्वतःच्या लग्नाबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘माझं लग्न ठरेल तेव्हा मी स्वतः सर्वांना सांगेल… की मी आता लग्न करत आहे. लग्नाच्या चर्चा अनेकदा होतात, त्यामुळे अशा चर्चांचा आता मला त्रास होत नाही…’ असं देखील रिंकू म्हणाली.

रिंकू कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.