
अभिनेत्री रिंकू राजगुरू कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत. मराठमोळ्या लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत आहे.

दसऱ्याच्या दिवशी अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सोशल मीडियावर रिंकू हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहते अभिनेत्रीच्या लूकचं कौतुक देखील करत आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. 'दसरा आणि विजयादशमी च्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा...' असं कॅप्शन अभिनेत्रीने लिहिलं आहे.

रिंकू हिच्याबद्दल सांगायचं झालं तर 'सैराट' सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे.

अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.