
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जी वयाच्या 54 व्या वर्षी देखील जगतेय सिंगल आयुष्य. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून आज ती तिचा 54 वा वाढदिवस साजरा करत आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री साक्षी तंवर आहे. जिने 1998 मध्ये टीव्हीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. ज्यामध्ये अनेक मालिकांचा समावेश आहे.

टीव्ही क्षेत्रासह तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये 'दंगल', 'मोहल्ला अस्सी', 'सम्राट पृथ्वीराज' अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

साक्षी तंवर 54 वर्षांची असून तिने अद्याप लग्न केलेलं नाही. मात्र, 2018 मध्ये तिने एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचे नाव दित्या तंवर आहे. ती एका शोसाठी तब्बल 1.25 लाख रुपये मानधन घेते.

साक्षी तंवरला 2012 मध्ये फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 मध्ये स्थान मिळालं आहे. रिपोर्टनुसार, तिची एकूण संपत्ती 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये तिच्या अनेक पिढ्या बसून खातील.