
Salman Khan Birthday Special : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज, 27 डिसेंबर रोजी 60 वर्षांचा झाला आहे. सलमान हा बॉलिवूडच्या अशा स्टार्सपैकी एक आहे ज्यांचे आयुष्य एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. त्याच्या चित्रपटांएवढीच चर्चा त्याच्या लव्ह लाइफ देखील बरंच बोललं जातं. भाईजानने अद्याप लग्न केलेले नसले तरी, त्याच्या आयुष्यात अनेक तरूणी आल्या आणि गेल्या. एकसे एक सुंदर अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं. सलमान खानचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते, त्यापैकी काहींशी त्याचे गंभीर संबंध होते, तर काही फक्त अफवा होत्या. सलमान खानच्या गर्लफ्रेंडच्या यादीत संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि लुलिया वंतूर सारख्या अनेक अभिनेत्रींची नावे आहेत. चला त्यावर एक नजर टाकूया..

सलमान खान आणि संगीता बिजलानी - सलमान खानचं पहिलं नातं संगीता बिजलानीसोबत होतं. ती सलमान खानची पहिली प्रेयसी मानली जाते. त्यांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं आणि त्याचदरम्यान ते प्रेमात पडले. त्यांचं नातं खूपच सीरियस होतं. असं म्हटलं जातं की सलमान आणि संगीताच्या लग्नाची पत्रिकाही छापण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव त्यांचं नातं तुटलं. या नात्याची खास गोष्ट म्हणजे ब्रेकअपनंतरही सलमान आणि संगीता चांगले मित्र राहिले. आजही सलमान खानच्या घरी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये संगीता बिजलानी अनेकदा दिसते.

सलमान खान आणि सोमी अली - संगीता बिजलानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर, सोमी अली सलमानच्या आयुष्यात आली. कराचीमध्ये जन्मलेली सोमी अली दबंग सलमानच्या इतकी प्रेमात पडली की ती 16 व्या वर्षी त्याला भेटण्यासाठी मुंबईत आली. मुंबईत आल्यानंतर, सोमी अलीने प्रथम मॉडेलिंगमध्ये आणि नंतर चित्रपटांमध्ये काम केले आणि यामुळे ती सलमान खानच्या जवळ आली. हळूहळू, ते प्रेमात पडले आणि जवळजवळ आठ वर्षे डेट करत होते. पण सलमान आपल्याशी लग्न करणार नाही याची जाणीव सोमीला झाली आणि त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर ती फ्लोरिडाला गेली.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय - mलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचं नातं कोणापासूनच लपलेलं नाही. त्यांची प्रेमकहाणी "हम दिल दे चुके सनम" च्या सेटवर सुरू झाली. सलमान आणि ऐश्वर्याची ऑन-स्क्रीन जोडी प्रेक्षकांनी ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन दोन्ही ठिकाणी खूप पसंत केली. पण, सलमान आणि ऐश्वर्याचे नाते बरेच वादग्रस्त होतं. ऐश्वर्या आणि सलमान 1999 ते 2002 पर्यंत एकमेकांना डेट करत होते. मात्र, सलमान त्यांचं नातं जास्त काळ सांभाळू शकला नाही आणि ऐश्वर्यावर बंधने घालू लागला. यानंतर, सलमानच्या वाईट वागण्यामुळे आणि नात्यात झालेल्या फसवणुकीमुळे ऐश्वर्या त्याच्यापासून वेगळी झाली.

सलमान खान आणि कतरीना कैफ - ऐश्वर्यापासून वेगळं झाल्यानंतर सलमानचे कतरिना कैफशी नाते जुळलं, जे अनेक वर्षे टिकलं. कतरिना कैफ आणि सलमान खान 2003 ते 2010 पर्यंत डेट करत होते. सलमानला भेटण्यापूर्वी कतरिना कैफची कारकीर्द फार ग्रेट नव्हती, पण सलमानसोबत 'मैने प्यार क्यूं किया' चित्रपट केल्यानंतर कतरिना कैफला एक नवीन ओळख मिळाली. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप गाजल्या. रिपोर्टनुसार, त्यांच्या लग्नाची तारीख अनेक वेळा जाहीर करण्यात आली होती, परंतु सलमान सेटल होण्यास तयार नव्हता. अखेर कतरिनानेही सलमानचा नाद सोडला.

सलमान खान आणि लुलिया वंतूर - कतरिना कैफनंतर 2016 मध्ये सलमानच्या आयुष्यात लुलिया वंतूरचा प्रवेश झाला. रोमानियन अभिनेत्री लुलिया वंतूरसोबतच्या सलमानच्या नात्याची खूप चर्चा झाली. लूलिया बऱ्याचदा सलमानच्या कुटुंबासोबतही दिसली. पण त्याचं कोणतंही नातं आत्तापर्यंत लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचलेलं नाहीये.