
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर धक्क्यात आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईतील बांद्रा परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर त्यांचे निधन झाले.

बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सलमान खान याच्याजवळ असल्यानेच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

बाबा सिद्दीकी यांच्या अत्यंदर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सलमान खान याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाही सलमान खान याने बाबा सिद्दीकीचे घर गाठले.

यावेळीचे आता सलमान खान याचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये सलमान खानचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय.

जवळचा मित्र गेल्याने सलमान खानला मोठा धक्का बसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची मैत्री अत्यंत जुनी आहे.