65 वर्षीय गंगुबाईची कमाल, बिबट्याला थेट घरातच कोंडलं, त्यानंतर तर…
गेल्या काही दिवसांपासून नारगी वस्तींमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. ज्यामुळे अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. पण आता मोठ्या आश्चर्याची घटना घडली आहे. चक्क 65 वर्षीय गंगुबाईने बिबट्याला घरात कोंडलं. ज्याचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची चांगलीच चर्चा होतीये. सध्या सर्वत्र फक्त फक्त गंगुबाई गायकवाड यांची चर्चा सुरु आहे. वयाच्या 65 वर्षी गंगुबाई गायकवाड यांनी असं काही केलं जे चकीत करणारं आहे.

गंगुबाई सकाळच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या चुलीवर स्वयंपाक करत असताना, अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला.. त्यावेळी मुलगा हरिभाऊ गायकवाड हे दरवाजालगत झोपलेले होते..

गंगुबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछान्यासह बाहेर ओढले आणि मोठ्या चातुर्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली.. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले..

बराच वेळ बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होता.. वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला जेरबंद केले.. या सर्व प्रसंगात 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सांगायचं झालं तर, गेल्या काही महिन्यांपासून वन्या प्राण्यांचं संचार नागरीवस्तीमध्ये वाढला आहे. ज्यामुळे लोकांचे बाहेर पडणं देखील धोक्याचं झालं आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.