
सानिया मिर्झा हिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने तिसऱ्यांदा लग्न केले. सानिया मिर्झा हिच्यासोबत चाहते देखील या लग्नानंतर हैराण झाले. या दोघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून घटस्फोट झाला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

आता नुकताच सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या तलाक होण्याचे कारण पुढे आलंय. सध्या सानिया मिर्झा हिची एक पोस्ट व्हायरल होत आहे.

सानिया मिर्झा हिची ही पोस्ट जुनी आहे. मात्र, ती सध्या चांगलीच चर्चेत आलीये. सानिया मिर्झा हिने त्या पोस्टमधून बरेच काही बोलून गेलीये.

सानिया मिर्झा हिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, जेव्हा एखादी गोष्ट तुमची शांतता भंग करत असेल... तेव्हा तिला जाऊ द्या.

सानिया मिर्झा हिचं वैवाहिक जीवन काही सुरळित नव्हतं. शोएब मलिक तिचा पार्टनर होता मात्र ज्यावेळी घटस्फोटाच्या अफवा उडाल्या होत्या तेव्हापासूनच काही अलबेल नव्हतं असं दिसत आहे. आता शोएब मलिक याने तिसरं लग्न केलं असून सना जावेद असं तिचं नाव असून ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.