
सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय.

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय. नुकताच तिसऱ्यांदा आता शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत निकाह केलाय.

आता शोएब मलिक याला सानिया मिर्झा हिला तगडी पोटगी द्यावी लागणार आहे. ही पोटगी करोडोंच्या आकड्यांमध्ये आहे.

शोएब मलिक याची 230 कोटी संपत्ती आहे. म्हणजे सानिया मिर्झासोबत घटस्फोट घेणे शोएब मलिक याच्यासाठी नक्कीच सोपे नाहीये. पहिल्या पत्नीला शोएबने 150 मिलियन दिल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

अचानक शोएब मलिक याने सोशल मीडियावर त्याच्या निकाहाचे फोटो शेअर केले. यानंतर सानिया मिर्झाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.