
संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही शिवसैनिक हजर नव्हता.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.

पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता रवाना झाले. दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही आहेत.

दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले होते. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले आणि दर्शन घेतलं.

संजय राठोड यांचे दर्शन घेतानाचे हे फोटो टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

संजय राठोड यांनी पत्नीसोबत पोहरादेवीचं दर्शन घेतलं .