
कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्रा आणि कॉमेडियन संकेत भोसले यांच्या जीवनाला नवी सुरुवात झाली आहे. आता लग्नानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुगंधाने हळदीचा एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये संकेत भोसले भावूक झालेला दिसला.

हा व्हिडीओ सुगंध आणि संकेत यांच्या साखरपुड्याचा आहे, जेव्हा संकेत आपलं प्रेम व्यक्त करत होता. यावेळी तो भावनिक झाल्याचं दिसून आलं. त्याच्या शेजारी उभी असलेली सुगंधा त्याचे अश्रू पुसताना दिसतेय. या गोंडस व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंत केलं आहे.

संकेत आणि सुगंधाने त्यांच्या हळदीचे फोटोही शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाची साडी नेसलेली सुगंधा या फोटोमध्ये खूपच गोंडस दिसत आहे, तर संकेतसुद्धा पांढरा कुर्ता पायजमामध्ये अप्रतिम दिसत आहे.

सुगंधानं लग्नाचेही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुगंधा आणि संकेतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या दोघांचे प्रीवेडिंग फोटोसुद्धा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.