
आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री सारा खानचा आज वाढदिवस आहे. सारा तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2007 साली स्टार प्लसवर प्रसारित झालेल्या 'सपना बाबुल का बिदाई' या पहिल्याच मालिकेने सारा खानने प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

साराने टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस 4' च्या घरात खूप चर्चेत राहिली होती. या सीझनमध्ये ती सतत चर्चेत राहिली आणि याचे एक मोठे कारण म्हणजे तिचे लग्न. अभिनेत्रीने 'बिग बॉस'च्या घरात अली मर्चंटशी लग्न केले.

पाकिस्तानमध्ये टीव्ही शो करणारी सारा खान ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे. यामुळे ती गेल्या काही महिन्यांपासून कराचीमध्ये होती आणि तिच्या पाकिस्तानी शोचे नाव 'ये कैसी मोहब्बत है' आहे. भारतात परतताना साराला इमिग्रेशन दरम्यान खूप त्रास झाला होता. साराने सांगितले की, पाकिस्तानमध्ये हा तिचा पहिला वाईट अनुभव होता.

सारा खान बर्याच वेळा विविध वादांमध्ये अडकली आहे, ज्यात पाकिस्तानमधील तिच्या ड्रेसवर झालेल्या टीकेपासून ते बाथटबमध्ये आंघोळ करतानाचे व्हायरल व्हिडिओ आणि अगदी लेस्बियन किसिंगपर्यंतचा समावेश आहे.

इतकेच नाही तर सारा अनेकवेळा न्यूड म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे, ज्यामुळे अभिनेत्रीच्या धर्मावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ओटीटीवर प्रसारित झालेल्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शोमध्ये सारा शेवटची दिसली होती.