घटस्फोटीत हिंदू अभिनेत्रीशी लग्न; पत्नीला धर्मांतराला भाग पाडल्याने अभिनेता होतो ट्रोल

'ससुराल सिमर का' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शोएब इब्राहिम हा टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कलाकार आहे. शोएबने शून्यातून सर्वकाही मिळवलं आणि त्यात त्याची पत्नी दीपिका कक्करने खूप साथ दिली. सध्या दीपिका कॅन्सरशी झुंज देत आहे. तिच्या या कठीण काळात शोएब तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.

| Updated on: Jun 23, 2025 | 8:07 AM
1 / 5
'ससुराल सिमर का' या मालिकेत एकत्र काम करताना अभिनेता शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कर एकमेकांच्या प्रेमात पडले. ही जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय होती. परंतु लग्नानंतर अनेकदा शोएब आणि दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

2 / 5
शोएब मुस्लीम आहे तर दीपिका हिंदू आहे. त्याच्याशी निकाह करण्यासाठी दीपिकाने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. दीपिकाला धर्मांतर करायला भाग पाडल्याने शोएबवर अनेकदा नेटकऱ्यांकडून टीका होते. शोएबशी दीपिकाचं हे दुसरं लग्न आहे.

3 / 5
दीपिका कक्करने 2011 मध्ये रौनक सॅमसनशी लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच या दोघांनी घटस्फोट घेतला. 2015 मध्ये दीपिका आणि रौनक विभक्त झाले. त्यानंतर 2018 मध्ये तिने शोएबशी निकाह केला. या दोघांना रुहान हा मुलगा आहे.

4 / 5
दीपिकाला नुकतंच लिव्हर कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर तिच्यावर 14 तासांची सर्जरी करण्यात आली. सर्जरीनंतर दीपिकाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ती सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहे. युट्यूबवरील व्लॉगद्वारे ती चाहत्यांना सतत तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स देत असते.

5 / 5
शोएबबद्दल बोलायचं झाल्यास त्याला 'ससुराल सिमर का' या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने 'झलक दिखला जा' या डान्स शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय 'अजूनी', 'कोई लौट कर आया' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने काम केलंय. तर दीपिकाने लग्नानंतर कामातून ब्रेक घेतला आहे.