
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आज स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिने सृष्टीत त्या अनेक वर्षांपासून सक्रीय आहेत. अनेक चित्रपट, गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलय.

ऐश्वर्या नारकर हे नाव फक्त मराठी चित्रपट सृष्टीपुरताच मर्यादीत नाहीय. मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या बरोबरीने त्यांनी हिंदी मालिकांध्येही आपली छाप उमटवली आहे.

फार कमी कलाकार असतात जे वेळेबरोबर स्वत:ला बदलतात. ऐश्वर्या नारकर अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाच महत्त्व ओळखून त्या सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात.

सोशल मीडियावरही ऐश्वर्या नारकर यांना प्रचंड फॉलोईंग आहे. क्रेझ आहे. त्यांच्या व्हिडिओ, फोटोंवर कमेंटसचा वर्षाव होत असतो. असाच एक व्यायामाचा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता.

'मॉर्निंग वाइब्स' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं होतं. त्यावर अनेक कमेंट्समधून त्यांचं कौतुक करण्यात आलं. पण एक युजरने 'जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस', अशी कमेंट केली. त्यावर त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत 'भाऊ कशाला स्वतःची लायकी दाखवता' असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.