
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी परत एकदा हिट ठरलीये. काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय.

सत्यप्रेम की कथा चित्रपट रिलीज होऊन आता दहा दिवस झाले असून चित्रपट हिट ठरलाय. सत्यप्रेम की कथा चित्रपटाने दहा दिवसांमध्ये 60 कोटींची कमाई केल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी कमाई थोडी कमी झाली होती. मात्र, परत एकदा शनिवारी चित्रपटाने जबरदस्त अशी कमाई केली आहे. रिपोर्टनुसार चित्रपटाने शनिवारी 4.85 कोटींचे कलेक्शन केले.

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या जोडीला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळताना दिसत आहे.

यापूर्वी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची जोडी भूल भुलैयामध्ये धमाल करताना दिसली होती. विशेष म्हणजे त्यांचा हा देखील चित्रपट हिट ठरला.