
सयाजी शिंदे यांचा जन्म 13 जानेवारी 1959 रोजी सातारा जिल्ह्यातील वेळे-कामठी या छोट्याश्या गावी झाला. विविध भाषांतील चित्रपटामध्ये अधिराज्य गाजवणारा एक दिग्गज अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांचे नाव घेतले जाते.

सयाजी शिंदे हे अनेकदा आपल्या गावी असलेले पहायला मिळतात. समोर आलेल्या काही फोटांमध्ये ते गावाकडे गुरे राखत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या मागे अनेक गायी उभ्या असलेल्या दिसत आहेत.

आणखी एका फोटोमध्ये सयाजी शिंदे हे एका आजीसोबत बसलेले दिसत आहेत. या आजीने नऊवारी साडी घालतेली आहे. सयाजी शिंदे हे त्यांच्याजवळ बसून फोटो काढताना दिसत आहेत.

Sayaया फोटोमध्ये सयाजी शिंदे हे गावाकडे फेरफटका मारताना दिसत आहेत. त्यांच्या हातात एक वनस्पती आहे. या फोटोत शिंदे यांच्या मागे शेती दिसत आहे. ji Shinde

सयाजी शिंदे गेल्या काही वर्षांपासून वृक्षारोपणाची चळवळ राबवत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला हिरवं बनवण्याचा संकल्पही त्यांनी हाती घेतला. सातारा जिल्ह्यातील अनेक दुष्काळी गावांमध्ये वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत.