Shah Rukh Khan Bungalow: किंग खानचा 300 कोटींचा बंगला, घरातील मंदीरात लक्ष्मी-गणरायाच्या मुर्तीसोबत कुरान, फोटो समोर

Shah Rukh Khan Bungalow: अभिनेता शाहरुख आज कुटुंबियांसोबत आलिशान आणि रॉयल आयुष्य जगत आहे. 'मन्नत' या बंगल्यात शाहरुख पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत आहे. बंगल्यातील मंदीरात लक्ष्मी-गणरायाच्या मुर्तीसोबत कुरान देखील आहे...

| Updated on: Sep 22, 2026 | 10:10 AM
1 / 6
अभिनेता शाहरुख खान मुंबईतील वांद्रे येथील आलिशान बंगल्यात राहतो. 'मन्नत' असं त्याच्या बंगल्याचं नाव आहे.  अभिनेत्याच्या बंगल्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. अभिनेत्याचा बंगला कोणत्या महलापेक्षा  कमी नाही.

अभिनेता शाहरुख खान मुंबईतील वांद्रे येथील आलिशान बंगल्यात राहतो. 'मन्नत' असं त्याच्या बंगल्याचं नाव आहे. अभिनेत्याच्या बंगल्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. अभिनेत्याचा बंगला कोणत्या महलापेक्षा कमी नाही.

2 / 6

सध्या 'मन्नत' बंगल्याचं काम सुरु आहे. अभिनेत्याच्या घराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. 2005 मध्ये आलेल्या 'द इनर अँड आउटर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान' या डॉक्यूमेंट्रीचं दिग्दर्शन लंडनच्या चित्रपट निर्मात्या नसरीन मुन्नी कबीर यांनी केले होतं.

3 / 6

या डॉक्यूमेंट्रीमध्ये किंग खानने त्याच्या 'मन्नत' या घरातील एका भागात असलेल्या मंदिराची झलक दाखवली होती. तिथे माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाच्या मूर्तींसोबत कुरण शरीफही ठेवलेलं पाहायला मिळालं.

4 / 6

सांगायचं झालं तर, किंग खान सर्व धर्मांचा आदर करतो. तो मुस्लिम आहे, तर गौरी हिंदू आहे. या जोडप्याने आपल्या तिन्ही मुलांना सर्व धर्मियांच्या परंपरांचे शिक्षण दिलं आहे. किंग खानने सांगितलं की, आर्यनला संपूर्ण गायत्री मंत्र येतो आणि त्याचा मुलगा पूजा-अर्चा देखील करतो.

5 / 6

शाहरुखच्या मते, त्याने मुलांना प्रत्येक धर्माचा आदर करायला शिकवलं आहे. अभिनेत्याची मुलं प्रत्येक धर्माच्या देवाचा मान राखतात. म्हणूनच त्यांच्या घरातील मंदिरात गणपती आणि लक्ष्मीच्या मूर्तीजवळ कुरण देखील ठेवण्यात आलं आहे. शाहरुखने सांगितले की, त्याचा अल्लाहवर गाढ विश्वास आहे.

6 / 6

पण, पालकांनी कधीही मुलांवर दिवसातून पाच वेळा नमाज पठण करावा म्हणून दबाव टाकला नाही. 'मन्नत'मध्ये दिवाळी, ख्रिसमस आणि ईद हे सर्व सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात. किंग खानने हे घर 18 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आज या घराची किंमत जवळपास 300 कोटी रुपये सांगितली जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us