Daddy Cool : शाहरुख-करिना पुन्हा एकत्र, ‘डॅडी कूल’ गाण्याची तुफान क्रेझ, किंग चित्रपट सुपरहिट ठरणार!
दरम्यान, या चित्रपटाचे 'डॅडी कूल' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि शाहरुख खान डान्स करताना दिसत आहेत.

बॉलिवुडचा किंग म्हणून ओळख असलेल्या शहारुख खानच्या किंग चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. या चित्रपटात शहरुख खान एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दीपिका पादूकोनही असेल.
दरम्यान, या चित्रपटाचे 'डॅडी कूल' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर आणि शाहरुख खान डान्स करताना दिसत आहेत. नव्या पिढीला आकर्षित करेल अशा पद्धतीचं हे गाणं आहे.
शाहरुख-करिना या जोडीने रुपेरी पडद्यावर कमाल केलेली आहे. या दोघांचे अनेक चित्रपट सुपरहीट ठरलेले आहेत. डॉन या चित्रपटातही दोघांनी एकत्र गाणं केलेलं आहे. या गाण्याला चांगली पसंती मिळाली होती.
या जोडीने 2006 साली 'ये मेरा दिल' हे गाणं एकत्र केलं होतं. आता पुन्हा एकदा ही जोडी डॅडी कूल या गाण्यात सोबत थिरकताना दिसत आहे. बघता बघता सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालताना दिसतंय.
शाहरुख खान आणि करिना कपूर खान यांचा 2011 साली रावन हा चित्रपट आला होता. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री गाण्याच्या रुपात पाहायला मिळणार आहे. किंग या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, याचीही सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.