
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या जवान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुख खान याने नुकताच चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले.

या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा अशा प्रकारचे सेशन घेताना दिसला.

नुकताच एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, असे कोणते काम आहे जे जवान चित्रपटामध्ये तुम्ही पहिल्यांदाच केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहेत. पठाण हा त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.