
शाहरुख खान याने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये नक्कीच गाजवला आहे. सोशल मीडियावर शाहरुख खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

शाहरुख खान याने अत्यंत मोठा संघर्ष केला आहे. एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान याने आपल्या वडिलांबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. शाहरुख थेट म्हणाला की, मला माझ्या वडिलांसारखे मरायचे नाहीये.

शाहरुख खान म्हणाला की, माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी तुटलो होते. माझी बहीण डिप्रेशनमध्ये गेली होती आणि अम्मी देखील पूर्णपणे निराश झाली होती.

माझ्या वडिलांना कॅन्सर होता. अनेक प्रयत्न करूनही त्यांना वाचवणे शक्य झाले नाही. वडिलांचे निधन झाल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाने बाॅडी घरी पोहचवण्यास देखील नकार दिला होता.

माझे वडील खूप चांगले होते. मला त्यांच्यावर गर्व आहे. मात्र, त्याच्या आत कुठेतरी अपयशाची भीती होती. वडिलांच्या निधनानंतर काय करावे हेच मला कळत नव्हते. आताही तो काळ आठवला की मला वाईट वाटते.