
बॉलिवूड कलाकार एका चित्रपटासाठी किती रुपये घेत असतील असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. तर जाणून घेऊयात की बॉलिवूडच्या कलाकारांनी त्यांच्या आगामी चित्रपटांसाठी किती मानधन घेतलंय.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहचा ‘83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटासाठी रणवीरनं 50 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

तर याच चित्रपटासाठी आलिया भट्टनं 10 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

तर आलिया भट्टचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गंगूबाई काठियावडी’ या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटासाठी तिनं 20 कोटी मानधन घेतलं आहे.

भाईजान सलमान खान ‘राधे’ या चित्रपटातील 80% प्रॉफीट शेअर करणार आहे.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारनं त्याचा आगामी चित्रपट ‘बेल बॉटम’साठी 120 कोटी मानधन घेतलं आहे.

‘पठाण’ या चित्रपटासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खाननं 120 कोटी मानधन घेतलं आहे.

‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिकानं 25 कोटी मानधन घेतलं आहे.

‘राधे शाम’ या चित्रपटासाठी अभिनेता प्रभासनं 80 कोटीचं मानधन घेतलं आहे.