
शाहरुख खान – बऱ्याच कमी लोकांना हे माहीत असेल, पण बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याला घोडेस्वारी करण्याती भीती वाटते. एका चित्रपटादरम्यान घोडेस्वारी करताना शाहरूखला दुखापत झाली होती, तेव्हापासून त्याच्या मनात ही भीती आहे. (Photos - Social Media)

कतरिना कैफ - अभिनेत्री कतरिना कैफबद्दल सांगायचे झाले तर तिला पालींची खूप भीती वाटते. याशिवाय तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ती टोमॅटोलाही घाबरते. जिंदगी मिलेगी ना दोबारा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिने यासंदर्भातील खुलासा केला होता.

सलमान खान – या लिस्टमधील आणखी एक नाव म्हणजे बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान. तो त्याच्या निडरपणासाठी, बेधडक अंदाजासाठी प्रसिद्ध आहे.

पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सलमान खान याला लिफ्टची भीती वाटते. त्यानेच याचा खुलासा एकदा केला होता.

अभिषेक बच्चन – अभिनेता अभिषेक बच्चन याचेही नाव या लिस्टमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिषेकला फळांची भीती वाटते. त्यामुळे तो फळं खात नाही. आता हे नक्की खरं आहे की नाही, हे तर तोच सांगू शकतो.

अर्जुन कपूर – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला पंख्याची भीती वाटते. म्हणून ज्या खोलीत पंखा सुरू असेल, तिथे तो कधीच थांबत नाही.