
अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या लव्हस्टोरीबद्दल आज सर्वांना माहिती आहे. आजही दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. पण हा प्रवास दोघांसाठी फार कठीण होता.

धर्म वेग-वेगळे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबियांचा दोघांच्या नात्याला नकार होता. पण गौरी आणि शाहरुख यांनी माघार घेतली नाही. स्वतःच्या बळावर दोघांनी त्यांचं साम्राज्य निर्माण केलं आहे.

शाहरुख आणि गौरी खान यांनी 1991 मध्ये दिल्लीत लग्न केलं. लग्नापूर्वी शाहरुख अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला होता आणि 1992 मध्ये 'दीवाना' या सिनेमातून त्याने पदार्पण केलं.

बॉलिवूडमध्ये शाहरुख स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसरीकडे, गौरी खान देखील तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होती. आज ती एक इंटीरियर डिझायनर आहे.

एवढंच नाही तर, गौरीने अनेक बॉलीवूड स्टार्सच्या घरांसाठी इंटीरियर तयार केले आहेत. गौरी निर्माती देखील आहे. तिने अनेक सिनेमांची निर्मिती देखील केली आहे. गौरी इंडस्ट्रीतील एक मोठं नाव आहे.