Shani Uday 2026 : शनिदेव करणार कृपा! या ५ राशींची साडेसाती संपणार, होणार मोठा कमबॅक

Shani Uday 2026 : अत्यंत प्रभावशाली आणि न्यायप्रिय देव म्हणून शनीकडे पाहिले जाते. आता काही राशींची साडेसाती संपणार असून त्यांच्या आयुष्यात भरभराट होणार असल्याचे दिसत आहे.

| Updated on: Apr 04, 2026 | 8:40 AM
1 / 8
हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायप्रिय आणि कर्मफळदाता म्हणून अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवणारे हे ग्रहाधिपती आपल्या प्रभावाने प्रत्येक राशीवर दीर्घकाळ परिणाम करतात. त्यामुळे शनिदेवांचा उल्लेख झाला की अनेकांच्या मनात आदराबरोबरच भीतीही निर्माण होते.

हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायप्रिय आणि कर्मफळदाता म्हणून अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब ठेवणारे हे ग्रहाधिपती आपल्या प्रभावाने प्रत्येक राशीवर दीर्घकाळ परिणाम करतात. त्यामुळे शनिदेवांचा उल्लेख झाला की अनेकांच्या मनात आदराबरोबरच भीतीही निर्माण होते.

2 / 8

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह आहे. सध्या शनि मीन राशीत आहे आणि १३ मार्च २०२६ पासून अस्त स्थितीत होता. आता २२ एप्रिल २०२६ रोजी शनिदेव पुन्हा उदय होणार आहेत. या उदयामुळे काही राशींवर विशेष सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता ज्योतिषी व्यक्त करत आहेत. या काळात शनिदेवांची विशेष कृपा पडण्याची शक्यता असलेल्या पाच राशी खालीलप्रमाणे:

3 / 8

4 / 8

मिथुन राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी कमी होतील. नवीन नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यासोबत यश आणि मान-सन्मानही मिळेल. एकूणच व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील.

5 / 8

सिंह राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील तणाव कमी होऊन आनंदी वातावरण निर्माण होईल. नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आरोग्याच्या समस्या कमी होऊन एकूणच स्वास्थ्य सुधारेल.

6 / 8

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शनिचा उदय अत्यंत शुभ ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. मित्र आणि कुटुंबीयांचा चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे मानसिक शांती आणि समाधान वाढेल. कर्जाच्या ओझ्यातून मुक्ती मिळण्याचीही शक्यता आहे.

7 / 8

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी उत्पन्न वाढीचे नवे मार्ग खुले होतील. शिक्षण किंवा ज्ञानसंबंधी क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. विशेषतः मुलांच्या प्रगतीमुळे मोठे समाधान मिळेल. आर्थिक अडचणी कमी होऊन स्थिरता येईल.

8 / 8

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us