डोळ्याला गॉगल अन् फुलांची आरास…; पवार कुटुंबातील नेक्स्ट जनरेशनचा हटके स्वॅग

यावेळी कुटुंबातील सदस्यांनीही पारंपरिक आणि रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. ज्यात महिलांच्या पिवळ्या, निळ्या, सोनेरी आणि केशरी रंगाच्या साड्या लक्ष वेधून घेत होत्या

Updated on: Dec 04, 2025 | 3:37 PM
1 / 12
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा शाही विवाह सोहळा नुकताच मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंब एकत्र पाहाय़ला मिळाले.

2 / 12
युगेंद्र पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि शरद पवार यांचे नातू आहेत. तर वधू तनिष्का कुलकर्णी या मूळच्या मुंबईकर असून त्यांच्या कुटुंबाची व्यावसायिक पार्श्वभूमी आहे.

3 / 12
युगेंद्र आणि तनिष्का यांचे लग्न हा एक मोठा कौटुंबिक सोहळा होता. या सोहळ्यासाठी पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच काही राजकीय नेत्यांनीही या लग्नाला हजेरी लावली.

4 / 12
यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले. खासदार सुप्रिया सुळे यांनी या सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी सोशल मीडियावर खास क्षणांचे फोटो शेअर केले. तसेच जोरादार डान्स करून सोहळ्याची रंगत वाढवली.

5 / 12
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लग्नाला आणि त्यापूर्वीच्या हळदी समारंभाला हजेरी लावली.

6 / 12
अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार यांनीही या सोहळ्यात उपस्थिती दर्शवली.  यावेळी ते दोघेही डोळ्याला गॉगल आणि पारंपरिक पोशाखात दिसत होते. यामुळे  पवार कुटुंबातील नेक्स्ट जनरेशनचा हटके स्वॅग कॅमेऱ्यात कैद झाला.

7 / 12
हा विवाह सोहळा अत्यंत नेत्रदीपक आणि भव्यदिव्य होता. वधू-वरांच्या पारंपरिक पोशाखापासून ते ठिकाणच्या सजावटीपर्यंत सर्वत्र शाही थाट पाहायला मिळाला. तनिष्का कुलकर्णी यांनी आपल्या लग्नासाठी लाल रंगाचा भरजरी लेहंगा घातला होता.

8 / 12
या लेहंग्यावर आकर्षक डिझाईन केली होती. तर युगेंद्र पवार पांढऱ्या आणि क्रीम रंगाच्या भरतकाम केलेल्या शेरवानी परिधान केली होती. या दोघांचा लूक फारच सुंदर दिसत होता.

9 / 12
यावेळी विवाह मंडपामध्ये गुलाबी आणि लाल रंगाच्या फुलांची मोठी आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. विशेषतः, छतावर लटकवलेल्या मोठ्या घंटा या सजावटीचे मुख्य आकर्षण ठरल्या.

10 / 12
या लग्नसोहळ्यावेळी वधू-वरांवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. हा क्षण अत्यंत अविस्मरणीय होता. यावेळी कुटुंबातील सदस्यांनीही पारंपरिक आणि रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते. ज्यात महिलांच्या पिवळ्या, निळ्या, सोनेरी आणि केशरी रंगाच्या साड्या लक्ष वेधून घेत होत्या.

11 / 12
या शाही विवाह सोहळ्याला महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आणि नवदाम्पत्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा यापूर्वी ३ ऑगस्ट २०२५ रोजी झाला होता, त्यावेळी देखील संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते.

12 / 12
(सर्व फोटो - युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे/ इन्स्टाग्राम)