
माझ्या पुर्ननियुक्तीनंतर मला पुन्हा निलंबित ठेवावं, असं माननीय शरद पवारांनी सांगितल्याची माहिती मला अनिल देशमुखांनी फोनवरून दिली. तेव्हा ते नागपुरात होते.

मला गृहमंत्र्यांनी असं सांगितलं, की ते पवारांना माझ्या नियुक्तीबद्दल राजी करतील आणि त्यासाठी त्यांनी मला 2 कोटी मागितले.

मी देशमुखांना सांगितलं की एवढे पैसे देऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी नंतर पैसे देण्यास सांगितलं.

माझी पोस्टिंग सीआययू युनिटमध्ये झाली. नंतर ऑगस्ट 2020मध्ये मंत्री अनिल परब यांनी मला त्यांच्या कार्यालयीन बंगल्यावर बोलावलं.

त्यांनी एसबीयू ट्रस्टच्या तक्रारीत लक्ष देण्यास सांगितलं. आणि असं म्हंटलं की ट्रस्टींना वाटाघाटीसाठी घेऊन या.

आणि त्यांनी मला तक्रार मागे घेण्यासाठी ट्रस्टींकडून 50 कोटी रुपये घेण्याची प्राथमिक बोलणी करण्यास सांगितलं. मी याबाबत असमर्थतात दर्शवली. सांगितलं की मी ट्रस्टमध्ये कोणाला ओळखत नाही.

जानेवारी 2021मध्ये अनिल परब यांनी मला पुन्हा बोलावलं आणि बीएमसीच्या फ्रॉड कंत्राटदाराच्या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं. आणि अशा 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी 2 कोटी घेण्यास सांगितले.

जानेवारी 2021मध्ये मला गृहमंत्र्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर बोलावलं. त्यावेळी पीए कुंदन तिथं उपस्थित होते

गृहमंत्र्यांनी मला सांगितलं मुंबईत 1650 बार आहेत आणि त्यांच्याकडून प्रत्येकी 3 ते 3.50 लाख रुपये जमा करण्यास सांगितले.