
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान राज कुंद्रा अवघा 10 वर्षांचा आहे. मात्र वियान नुकताच स्वतःचा स्टार्टअप सुरु केल्याची माहिती शिल्पा शेट्टीने दिली आहे सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टीने सोशलमीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित आपल्या मुलाच्या स्टार्टच्या कल्पनेबद्दलही माहिती दिली आहे. वियानने कस्टमाइज्ड स्नीकर्स बनवले असल्याची माहिती दिली आहे.

वियान राज कुंद्राने त्यांच्या ब्रँडचे नाव VRKICKS व Viaan Kick असे ठेवले आहे. त्याच्या या स्टार्टमध्ये कस्टमाइज्ड शूज, कपडे, व बॅग बनवण्यात येणार आहे. या उत्पादनाची किंमत 4999 पासून सुरु होणार आहे. या स्टार्टमधून होणारे उत्पादन शिल्पा शेट्टी फौंडेशनला जाणार आहे.

शिल्पा शेट्टीने व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझा मुलगा विआन-राजचा पहिला आणि अनोखा व्यावसायिक उपक्रम @vrkickss. 'कस्टमाइज्ड स्नीकर्स', लहान मुलांना आणि त्यांच्या मोठ्या स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले पाहिजे. असे तिने लिहिले आहे.

कल्पनेपासून ते उपक्रमापर्यंत, डिझाइन आणि अगदी व्हिडिओपर्यंत सर्व काही त्यांनी केले आहे. उद्योजक आणि डायरेक्टर , हे किती आश्चर्यकारक आहे, इतक्या लहान वयात त्याने यामधील काही उत्पन्न दान करीन असे वचन दिले आहे. असेही तिने लिहिले आहे.