
शिवसेना नेते आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज शिवसेनेच्या 'शिवसंवाद' यात्रेची सुरुवात कोकणातील कुडाळ येथून झाली. येथे उपस्थित शिवसैनिकांसोबत संवाद साधला अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना, शिवसेना प्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे 'रडायचं नाही लढायचं' आपण लढणार आणि जिंकणारच, असा त्यांना विश्वास दिल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.

सावंतवाडी येथेही शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. कोकणवासियांनी नेहमीच शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते.

या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिलाही सहभागी झाले होते.

बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो , शिवसेनेचा झेंडा हात घेऊन आलेले शिवसैनिक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

शिवसैनिकांच्या सोबत संवाद साधल्यानंतर त्यांच्या आदित्य ठाकरे यांनी उपस्थित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत सेल्फीही घेतला