‘शिवा’ला आशुतोष देणार घटस्फोट? मालिकेच्या कथानकात आश्चर्यकारक वळण

'शिवा' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेच्या कथानकात अत्यंत रंजक वळण आलं आहे. यामध्ये पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

| Updated on: Jan 07, 2025 | 3:39 PM
1 / 5
झी मराठी वाहिनीवरील 'शिवा' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शिवा आणि आशू गुळूंब गावावरून  घरी आलेत. आशू गायब झाल्याच्या धक्क्याने सीताई अंथरुणाला खिळलेली होती. आशू सुरक्षित असल्याचं पाहून ती सुटकेचा नि:श्वास सोडते

2 / 5
सातार्‍यात नेमकं काय घडलं याची विचारणा सीताई आशूला करते. आशू खोटं सांगून सत्य लपवतो, पण सीताई शिवाला सातार्‍यात काय घडलं ते सांगायला भाग पडते. शिवा आशूच्या अपहरणाचा सगळा प्रकार सांगते. हे ऐकून सीताई संतापते आणि सगळ्या घडलेल्या प्रकारासाठी शिवालाच जबाबदार ठरवते.

3 / 5
इकडे किर्ती वस्तीत जाऊन हा मुद्दा उचलते आणि बाईआजी, वंदनाला आशूसोबत जे घडलं त्यासाठी माफी मागायला लावते. शिवा तिथे पोहोचताच कीर्ती हे सगळं सीताईनेच करायला सांगितल्याचं सांगते.

4 / 5
शिवा सीताईला अपहरण नाट्याबद्दल समजावण्याचा प्रयत्न करते, पण सीताई तिला ठामपणे नकार देते आणि तिला घटस्फोटाच्या कागदांची आठवण करून देत म्हणते, "तुझ्याकडे आता फक्त एक महिना उरलाय. मग तुला या घरातून जावंच लागेल."

5 / 5
शिवा हादरून जाते कारण तिला कळतं की आता आशूनेही तिची साथ सोडली आहे. दरम्यान देसाई कुटुंबात एका नवीन मुलीचं आगमन होणार आहे.  तिचा स्वभाव आणि संस्कारांनी सगळे प्रभावित होतात.