लोकांना वाटतं मी ॲटिट्यूडवाली, रागीट..; असं का म्हणाली शिवानी सोनार?

यंदाची दिवाळी शिवानी सोनारसाठी खूपच खास आहे. लग्नानंतरची तिची ही पहिलीच दिवाळी असून पती अंबरने तिच्यासाठी खास सरप्राइजसुद्धा प्लॅन केला आहे. याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली.

| Updated on: Oct 20, 2025 | 4:18 PM
1 / 5
दिवाळी ही प्रत्येकासाठी खास असते, पण एका नवविवाहित स्त्रीसाठी ती आणखीनच खास भावना घेऊन येते. पहिली दिवाळी सासरी साजरी करणं आणि ते ही नव्या घरात, नव्या माणसांत आपली ओळख निर्माण करणं, आणि जुन्या आठवणींना नव्या आनंदाने सजवणं.

2 / 5
अभिनेत्री शिवानी सोनार म्हणजेच तारिणी, तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. शिवानी म्हणाली, "आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी आई-वडील आणि भावासोबत घरी दिवाळी साजरी केली आहे, पण यंदा माझं लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे आणि पहिली दिवाळी सासरी असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता आहे."

3 / 5
"मी कायम सगळे दिवाळीचे रितीरिवाज पाळले आहेत, मग तो फराळ करणं असो, रांगोळी काढणं, अभ्यंगस्नान, किल्ला बनवणं आणि यंदाही शुटिंग सुरू असतानाही शक्य असेल तेवढं सगळं करणार आहे. यंदाचा  दिवाळी पाडवा माझ्यासाठी खास आहे, कारण हा माझा पहिला पाडवा आहे आणि अंबरने माझ्यासाठी काहीतरी सरप्राइझ प्लॅन केलं आहे, त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे," असं तिने सांगितलं.

4 / 5
दिवाळीतील फराळबद्दल जेव्हा शिवानीला विचारलं गेलं की ती कोणत्या पदार्थासारखी आहे, त्यावर ती म्हणाली "मला असं वाटतं की मी करंजीसारखी आहे. बाहेरून कडक पण आतून गोड. कारण कधी कधी लोकांना वाटतं मी अ‍ॅटिट्यूडवाली, रागीट, आहे, पण तसं काही नाही. जेव्हा मी कुणावर जीव लावते, तेव्हा मी त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या खूप जोडली जाते."

5 / 5
"यंदाची भाऊबीजसुद्धा माझ्यासाठी खास आहे, कारण माझ्या भावाला पहिली नोकरी लागली आहे आणि तो मला यंदा स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून गिफ्ट घेणार आहे. याआधी आईवडील त्याला गिफ्ट घेऊन द्यायचे आणि तो मला द्यायचा. पण यंदा तो स्वतः कमावून देणार आहे. माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे," अशा शब्दांत तिने आनंद व्यक्त केला.