
भारतातील प्रत्येक घरांमध्ये आणि अनेक पदार्थांमध्ये लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. लसूण पेस्ट, भाजीला, वरणाला फोडणी देण्यासाठी तर काही जण अगदी कच्चाही लसून वापरतात. पण लसूण सालीसकट खावा की सोलून खावा, असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

लसूण फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, जे अनेक रोगांना प्रतिबंध करण्यास मदत करतात. पोटात जळजळ आणि गॅससारख्या समस्यांवर झटपट आराम मिळवण्यासाठी लसूण खूपच फायदेशीर शकतो असे म्हटले जाते.

साधारणपणे आपण लसूण सोलूनच वापरतो. पण, लसणाच्या सालीमध्ये फायबर असते, जे पचायला थोडे कठीण असले तरी त्याचा वापर करणं योग्य ठरते. काही निसर्गोपचार पद्धतींमध्ये लसूण शिजवून किंवा सालीसकट उकळून खाण्याची शिफारस केली जाते.

सालीसकट लसूण खाल्ल्याने त्याचे अतिरिक्त फायदे मिळतात. लसणाच्या सालीमध्ये अधिक अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि पॅलिटॅन्स असू शकतात, जे शरीरासाठी उपयुक्त आहेत. लसूण हृदयासाठी चांगला मानला जातो. तो सालीसकट खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित होतो, कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे मानले जाते.

लसणामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबायोटिक गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट करतात. सालीसकट लसूण खाल्ल्याने या गुणांचे प्रमाण अधिक वाढते. तसेच लसणाची साल फायबरयुक्त असल्याने ती पचनक्रिया सुधारण्यास आणि आतड्यांच्या समस्या कमी करण्यास मदत करू शकते.

सालीसकट लसूण खाल्ल्याने मेटाबॉलिझम वाढतो. तसेच शरीरातील चरबी जलद गतीने कमी होऊ शकते. त्यासोबतच लसूणमध्ये अँटीस्ट्रेस गुणधर्म असल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.

रक्तदाब कमी करण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. सालीसकट लसूण खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. लसणामध्ये अनेक कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. तो सालीसकट खाल्ल्यास शरीरातील कॅन्सर पेशी कमी होण्यास मदत होते, असे काही अभ्यासातून समोर आले आहे.

लसूण तव्यावर भाजल्यास त्याची साल मऊ होते आणि तो खाणे सोपे होते. सूप बनवताना किंवा ग्रेव्हीमध्ये तुम्ही सालीसह लसूण वापरू शकता. काही लोक ग्रीन टी किंवा काढ्यातही लसूण सालीसकट उकळून घालतात.

जरी सालीसकट लसूण खाण्याचे काही फायदे अधिक असेल तरी सर्वसामान्यपणे लसूण सोलून खाणेच अधिक पसंत केले जाते. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील, तर लसूण सोलूनच खावा. कच्च्या लसणाच्या साली चघळणे कठीण असू शकते. त्यामुळे त्या काढून खाऊ शकता.

लसणाची चव सालीसकट कडवट शकते. पण सोललेला लसूण अधिक नैसर्गिक आणि रुचकर लागतो. लसणाच्या पाकळ्यांमध्ये अनेक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. एकंदरीत, लसूण सोलून खाणे आणि न सोलता खाणे या दोन्हीचे तितकेच फायदे आहेत.