
भारतीय महिला क्रिकेट संघाची मराठमोळी स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचा तिच्या सांगली शहरात जंगी विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाहासाठी अनेक बड्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु आता हा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे हा विवाहसोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून स्मृतीच्या विवाहाची चर्चा होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडू सांगलीत आल्या होत्या.

याच खेळाडूंमध्ये श्रेयांका पाटीलने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. स्मृतीच्या विवाहसोहळ्यात श्रेयांका पाटील खूपच चान दिसत होती. ती चांगलीच सजली होती. तिने संगीत नाईट, हळदी समारंभ तसेच लग्नासाठी खूपच सुंदर कपडे परिधान केले होते.

याच समारंभातले काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर अपलोड केले होते. यातील काही फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलेला दिसतोय. सोबतच तिच्यासोबत महिला क्रिकेट संघाचा भाग असलेली जेमीमाह हीदेखील दिसत आहे. दोघींनीही मस्त असे फोटोशूट केले आहे.

गुलाबी रंगाचा लेहंगा, त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज आणि त्यावर साजेसा मेकअप अशा लुकमध्ये असलेली श्रेयांका इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. तिच्या फोटोंना तब्बल 22 लाखांपेक्षा जास्त लाईक्स आहेत.