
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने आई सुप्रिया आणि वडील सचिन यांच्यासोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद लुटला. या व्हेकेशनचे फोटो ती सतत सोशल मीडियावर शेअर करतोय. आता सुप्रिया पिळगावकर यांनीसुद्धा या खास व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.

श्रियाची ही पहिलीच मालदीव सफर आहे. लहानपणी आईने सांगितलेली एक कथा आणि त्यावरून तिने आईला दिलेलं वचन लक्षात ठेवून श्रिया आई-वडिलांसोबत मालदीवला फिरायला गेली.

यावेळी श्रिया आणि सुप्रिया- सचिन पिळगावकर यांनी वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेतला.

सुप्रिया आणि सचिन पिळगावकर यांनी मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी एकमेकांसोबत निवांत क्षण घालवले.

श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची एकुलती एक मुलगी आहे. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते.

श्रियाने मिर्झापूरसह इतरही काही वेब सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सुप्रिया पिळगावकर यांनी पोस्ट केलेला सचिन यांचा हा खास फोटो