Shubhangi Lokhande : सावित्रीच्या लेकीची भरारी! शुभांगी लोखंडे वैदू समाजातील पहिली महिला डॉक्टर

Shubhangi Lokhande : सावित्रीच्या लेकींनी शिक्षणात मोठी भरारी घेतली आहे. अहिल्यानगरमधील शुभांगी लोखंडे हिने वैद्यकीय शिक्षणात मोठी झेप घेतली आहे. ती वैदू समाजातील पहिली महिला डॉक्टर झाली आहे. तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

| Updated on: May 27, 2025 | 2:17 PM
1 / 6
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. वैदू समाजात शिक्षणाचा तसा अभाव. पण या समाजातील एका तरुणीने शिक्षणाची कास धरत मोठी मजल मारली आहे.

2 / 6
अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथील वैदू समाजातील शुभांगी लोखंडे राज्यातील पहिली महिला डॉक्टर आहेत. शुभांगी लोखंडे हिने वैद्यकीय शिक्षणात मोठी झेप घेतली आहे.

3 / 6
ज्या समाजात जातपंचायीचा जाच होता, अनिष्ट प्रथा , अंधश्रद्धा , रुढी आणि परंपरा होत्या तिला शुभांगीच्या प्रेरणादायी प्रवासाने छेद दिला आहे.

4 / 6
ज्या समाजात मुलीला शिकवणं गुन्हा मानलं जात होतं, अशा भटक्या आणि सामाजिक विकासापासून दूर असलेल्या वैदू समाजाची बंधने झुगारून शुभांगीने रचलेला पाया अनेकांना प्रेरणा देणारा आहे.

5 / 6
अशिक्षित असूनही आजोबांनी दिलेला पाठबळ आणि आई - वडिलांची मिळालेली साथ यामुळे शुभांगी आज समाजात मुलींसाठी प्रेरणा देणारी ठरली आहे.

6 / 6
तिच्या या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.