SIM Card New Rules 2026: उद्यापासून सिमकार्ड नियम बदलणार !,तुमच्या नावावर किती सिम ? असे तपासा अन्यथा…
SIM Card New Rules 2026:मोबाईल आता जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग पासून ते बँकींग, युपीआय, सोशल मीडिया आणि ऑनलाईन शॉपिंग पर्यंत अनेक काम मोबाईलने करता येतात. तसेच तुमच्या नावे किती सिम कार्ड सुरु आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठीही गरजेचे आहे. 24 ऑगस्ट 2026 म्हणजे उद्यापासून देशात सिम कार्ड जारी करण्याशी संबंधित नियमांना आणि कठोरपणे लागू केले जाणार आहे.काय आहेत नियम वाचा...

SIM Card New Rules
- सर्वसाधारण एका व्यक्तीच्या नावावर कमाल 9 मोबाईल कनेक्शनची परवानगी आहे. मात्र, जम्मू-काश्मीर, आसम आणि पूर्वेकडील राज्यात ही मर्यादा 6 इतकी आहे. वेगळ कंपनीचे सिम नंबर असले तरी एकूण कनेक्शनची संख्या मोजली जाणार आहे.
- 24 ऑगस्टपासून लागू होणाऱ्या नव्या नियमाचा हेतू याचा वापर रोखणे आणि युजरची ओळख जास्त चांगल्या प्रकारे ट्रॅक करणे हा आहे. चला तर पाहूयात 24 ऑगस्टपासून नेमके काय बदलणार ?
- 24 ऑगस्ट 2026 पासून टेलिकॉम कंपन्या ज्यांच्या नावाने आधी मर्यादेहून जास्त कनेक्शन जारी झाले आहेत, त्याला आणखी नवे कनेक्शन मिळू न देण्याची व्यवस्था लागू होणार आहे.जर एखाद्या व्यक्तीच्या नावाने आधीच 9 मोबाईल कनेक्शन आहेत, तर त्याला नवीन SIM कनेक्शन मिळणार नाही.
- समजा तुमच्याकडे एअरटेल 5 नंबर, जिओ 3 नंबर आणि व्होडाफोनचा 1 नंबर आहे. म्हणजे एकूण 9 कनेक्शन्स होतात. आता, जर तुम्ही बीएसएनएल किंवा दुसऱ्या ऑपरेटरकडून 10 वे सिम घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नवीन सिम नंबर मिळणार नाही.
- या नियमाने आणखी एक गोष्ट उघड होणार आहे ती म्हणजे जर तुमच्या नावावर अशा नंबर चालू आहे जो तुम्ही कधीच घेतलेला नाही. तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. कागदपत्रांचा गैरवापर करुन जारी केलेले मोबाईल कनेक्शनचा वापर सायबर फ्रॉडसह अनेक बेकायदेशीर कामासाठी केला जाऊ शकतो.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us