
जर तुम्ही सिंगापूरला जाण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तिथल्या चलनाची ताकद समजून घेणे तुमच्या बजेटसाठी खूप महत्त्वाचे आहे. सिंगापूर हे केवळ त्याच्या चकचकीत इमारतींसाठीच नाही, तर तिथल्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.

जगातील श्रीमंत देशांपैकी एक दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सिंगापूर जगातील पहिल्या ५ देशांमध्ये येतो. येथील व्यापार आणि कुशल कामगारांमुळे अर्थव्यवस्था अत्यंत भक्कम आहे.

आशियातील तिसरा सर्वात आनंदी देश म्हणून सिंगापूरकडे पाहिले जाते. २०२५ च्या 'वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स' नुसार सिंगापूर जगात ३४ व्या तर आशियात ३ -या क्रमांकावर आहे. केवळ पैसाच नाही, तर आरोग्य आणि सामाजिक सुरक्षिततेतही हा देश अव्वल आहे.

या ठिकाणी असलेले नागरिक आनंदी असण्याचे मुख्य कारण म्हणजे तिथले वर्क-लाइफ बॅलन्स आहे. तसेच सिंगापूरच्या आरोग्य सुविधा आणि सामाजिक आधारामुळे लोकांचे जीवनमान उंचावले आहे.

सिंगापूरची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जागतिक दर्जाची आहे. तसेच, भ्रष्टाचाराचे प्रमाण अत्यंत कमी असून पारदर्शक प्रशासनावर भर दिला जातो. या ठिकाणी मोठमोठ्या इमारती असूनही सिंगापूरने आपले नैसर्गिक सौंदर्य जपले आहे. ज्यामुळे पर्यटकांना तिथे फिरताना प्रसन्न वाटते.

सिंगापूरचे अधिकृत चलन सिंगापूर डॉलर (SGD) आहे. भारतीय रुपयाच्या तुलनेत हे चलन खूप मजबूत आहे. सध्याच्या दरानुसार एक भारतीय रुपया म्हणजे अंदाजे 0.014 सिंगापूर डॉलर इतके होतात. याचाच अर्थ भारताच्या १०० रुपयाची किंमत सिंगापूरमध्ये फक्त १.४१ सिंगापूर डॉलर्स इतकी असेल.