AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्या आंबेकरचं मालिकाविश्वात पदार्पण; ‘या’ लोकप्रिय मालिकेत साकारली भूमिका

आर्या आंबेकरने मालिकच्या या खास भागांमध्ये काही गाणीसुद्धा गायली आहेत. तिच्या व्यक्तिरेखेत गाण्यालाही महत्त्व होतं. मालिकेच्या भागांमध्ये तिने भारतीय संगीताविषयी थोडी माहितीसुद्धा सांगितली आहे. ही मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Apr 09, 2026 | 1:20 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. कथानकातील सतत येणारी मनोरंजक वळणं, पात्रांमधील भावनिक गुंतागुंत आणि नात्यांमधील चढ-उतार यामुळे ही मालिका अधिकच उत्कंठावर्धक बनत आहे. कमळी आणि ऋषी यांच्या नात्यातील नवीन घडामोडी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे, जी त्यांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणार आहे.

1 / 5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर हिची ‘अनामिका’ या भूमिकेतून मालिकेत विशेष एण्ट्री झाली आहे. अनामिका ही धाडसी, सकारात्मक आणि स्पष्टवक्ती मुलगी असून, तिच्या स्वभावामुळे कमळी आणि ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण होणार आहे.

2 / 5
या खास भागांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल आर्या आंबेकर म्हणाली, “मला ओशन फिल्म कंपनीकडून या खास भूमिकेसाठी  फोन आला होता. एका कॉलेजमधील म्युझिक टीचर, म्हणजेच संगीत प्राध्यापकाची भूमिका करण्याबद्दल त्यांनी विचारलं. अभिनय आणि संगीत यांचा खूप जवळचा संबंध आहे असं मी नेहमी मानते, विशेषतः संगीताशी संबंधित भूमिका करताना. त्यामुळे मला ही भूमिका लगेच आवडली आणि मी होकार दिला."

3 / 5
"झी मराठी हे माझ्यासाठी नेहमीच खूप खास व्यासपीठ राहिलं आहे. माझ्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे इथंच घडले. मी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये स्पर्धक होते आणि नंतर परीक्षक म्हणूनही काम केलं. झी मराठीच्या चित्रपटांमध्येही मी काम केलं आहे, इथंच माझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला, तसंच त्यांच्या मालिकांसाठी मी शीर्षक गीत  आणि प्रेमगीतं गायली आहेत," असं ती पुढे म्हणाली.

4 / 5
"माझ्या व्यक्तिरेखेचं नाव ‘अनामिका’ आहे. ती खूप धाडसी आणि सकारात्मक मुलगी आहे. तिचे संवाद खूप ठाम आहेत. जे आपण खऱ्या आयुष्यात सहज बोलत नाही. मी स्वतः थोडी लाजरी आहे, पण अनामिका खूप व्यक्त होणारी आणि निडर आहे. ती तिचं मत स्पष्टपणे मांडते आणि कमळी-ऋषी यांच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट निर्माण करण्यात तिची मोठी भूमिका असणार आहे," असं आर्याने सांगितलं.

5 / 5
Follow Us
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....