लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये राहिला मराठमोळा गायक; म्हणाला “दोघांचीही ती गरज..”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध मराठी गायक त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. लग्नाआधी हा गायक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. यामागचं कारण त्याने या मुलाखतीत सांगितलं आहे.

| Updated on: Jan 25, 2026 | 10:32 AM
1 / 5
'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून गायक रोहित राऊत घराघरात पोहोचला. त्यानंतर तो विविध रिअॅलिटी शोजमध्ये झळकला आणि मराठी कलाविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच त्याने 'आय पॉपस्टार' या शोचंही विजेतेपद पटकाववलं होतं.

2 / 5
रोहित राऊतने 2022 मध्ये गायिका जुईली जोगळेकरशी लग्न केलं. लग्नापूर्वी हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिप राहत होते. यामागचं कारण रोहितने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. या मुलाखतीत रोहित त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

3 / 5
'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत रोहित म्हणाला, "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं ही आमची गरजच होती. कारण तेव्हा आम्हा दोघांकडेही पैसे नव्हते. शोजमधून आम्ही जे काही पैसे मिळवतो, ते आम्हाला 90 दिवसांनंतर मिळतात आणि तेसुद्धा 30% कट होऊन येतात. तेव्हा जुईलीसुद्धा भाड्याच्या घरात राहत होती आणि माझीही परिस्थिती काही वेगळी नव्हती."

4 / 5
"जुईली आणि मी यावर विचार केला आणि मग कुटुंबीयांना सांगितलं की आता आम्हाला इतका खर्च परवडत नाहीये. माझ्या बाबांना आमच्या नात्याची कल्पना होतीच. मी जुईच्याही वडिलांना समजावलं की पुढचा संसार सुरळीत करायचा असेल तर आम्हाला आतापासूनच पैसे जमवायला लागतील", असं रोहितने पुढे सांगितलं.

5 / 5
याविषयी तो पुढे म्हणाला, "लिव्ह इनमध्ये राहण्यासाठी आम्हाला त्यांची खूप मनधरणी करावी लागली होती, खूप विनवण्या कराव्या लागल्या होत्या. इंडियन आयडॉल संपल्यानंतर एक महिन्याच्या ब्रेकनंतर लगेच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला होता. आमच्या आईवडिलांना आणि मित्रमंडळींनाही याची कल्पना होतीच."