
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा किताब जिंकणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम एका नव्या मालकाच्या शोधात आहे. या फ्रेंचायजीची वॅल्यू सध्या दोन अब्ज डॉलर (जवळपास 17587 कोटी रुपये) आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार जवळपास 6 कंपन्यांनी ही फ्रेंचायजी विकत घेण्यास रस दाखवला आहे. (Photo-PTI)

RCB ची मूळ कंपनी डियाजियो ग्रेट ब्रिटनने ही कंपनी विकण्याचं ठरवलं तर ही टीम विकत घेण्यासाठी रांग लागू शकते. यात एक कंपनी अशी आहे, ज्यांच्याकडे पहिल्यापासून आयपीएल टीम आहे. (Photo-PTI)

कंपनीचे शेअरहोल्डर्स या आयपीएल टीमसोबत राहण्यास फार उत्सुक नाहीयत. रिपोर्ट्सनुसार, आरसीबीच्या संभाव्य विक्रीसंबंधी डियाजियोसोबत चर्चा करणाऱ्या भारतीय आणि अमेरिकी संस्थांमध्ये अदानी समूह, जेएसडब्ल्यू समूह आणि अदार पूनावाला आहेत. (Photo-PTI)

अमेरिकेच्या दोन खासगी इक्विटी कंपन्यांना सुद्धा RCB मध्ये रस आहे. दिल्लीचा एक बिझनेसमन सुद्धा यात आहे. पुनावाला कुटुंबाने याआधी सुद्धा आयपीएल टीम विकत घेण्यास रस दाखवला होता. अदारचे वडील सायरस पुनावाला यांनी 2010 साली ललित मोदींच्या नेतृत्वाखाली आयपीएलच्या विस्तारावेळी आयटीटीला जवळपास विकत घेतलं होतं. पण अखेरच्या क्षणी सहारा आणि रेंडेजवस स्पोर्ट्सने बाजी मारली. पुणे आणि कोच्चीच्या दोन टीम्स जास्तवेळ आयपीएलमध्ये टिकू शकल्या नाहीत. (Photo-PTI)

जिंदल समूहाची दिल्ली कॅपिटल्समध्ये 50 टक्के भागीदारी आहे. जर, त्यांनी आरसीबीसाठी बोली लावली, तर त्यांनी दिल्ली कॅपिटल्समधन बाहेर पडावं लागेल. (Photo-PTI)