
सध्या प्रत्येकाच्या आयुष्यात मोबाईल फोन अत्यंत महत्वाचा घटक बनला आहे. सकाळी झोपीतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. बरेच लोक रात्री झोपताना देखील मोबाईल फोन जवळ ठेवतात.

जर तुम्ही देखील मोबाईल फोन जवळ ठेवून झोपत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि धोकादायक नक्कीच आहे. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश हा आपल्या शरीरामधील हार्मोनवर थेट परिणाम करतो. यासोबतच त्याचा त्वचेवरही वाईट परिणाम होतो.

रात्री उशीरापर्यंत तुम्ही मोबाईल घेऊन बसला तर त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर थेट होतो आणि हळूहळू दिसण्यास समस्या निर्माण होतात.

यासोबतच जर तुम्ही झोपताना अधिक वेळ मोबाईल फोनचा वापर केला तर लवकर झोप लागत नाही. कधी कधी ही समस्या इतकी जास्त वाढते की, झोप लागल्याची समस्याही निर्माण होते.