चिमुकल्याने पिलं असं काही की थेट वाचा गेली, घडलेल्या घटनेने आई-वडील हादरले; काय काळजी घ्यावी?

सध्या एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बाळाने शरीराला गंभीर इजा पोहोचवणीरा द्रव पदार्थ थेट पिऊन घेतला आहे. या घटनेमुळे पालकही घाबरून गेले असून आता त्यांना भविष्याची चिंता सतावते आहे.

Updated on: Nov 22, 2025 | 7:14 PM
1 / 5
लहान मुलांची फार काळजी घ्यावी लागते. मुल कधी काय करेल हे सांगता येत नाही. आई-बाबाचे दुर्लक्ष झाल्यावर अनेकदा छोट्या बाळासोत गंभीर प्रकार घडल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. असे असतानाच आता एका 13 महिन्यांच्या बाळासोबत हादरवून टाकणारा प्रकार घडला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनमधील बर्मिंघम येथे एका 13 महिन्याच्या चिमुकल्याने साफसफाई करण्यासाठी वापरले जाणारे ड्रेन क्लिनर पिऊन घेतले. ड्रेन क्लिनरचा रंग पांढरा होता. त्या बाळाला बॉटलमध्ये ठेवलेले ड्रेन क्लिनर दूध वाटले. याच समजातून त्याने ड्रेन क्लिनर पिऊन टाकले. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
ही घटना घडली तेव्हा त्या बाळाची आई बाथरुमची साफसफाई करते होती. आईचे थोडे दुर्लक्ष झाल्यानंतर बाळाने लगेच ड्रेन क्लिनरची बॉटल तोंडाला लावली. ड्रेन क्लिनर पिल्यानंतर बाळाच्या अन्ननलिकेला फार मोठी दुखापत झाली आहे. बाळाची जीभ, ओढ यांनाही इजा पोहोचली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
या बाळाचे वडील नदीन अलशमेरी यांनी सांगितल्यानुसार ही घटना याच वर्षाच्या मे महिन्यात घडली असून अजूनही ते बाळ बोलू शकलेले नाही. दुध समजून या बाळाने ड्रेन क्लिनर पिऊन घेतल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. या बाळाला डॉक्टरांकडे उपचारास नेल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटकाही आल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले आहे.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
दरम्यान, एक वर्ष झाल्यानंतर बाळ बोलण्याचा प्रयत्न करते. परंतु या बाळाच्या जिभेला, ओठांनाच इजा झाल्यामुळे त्याचा आवाज कायमस्वरुपी गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. बाळ मोठे झाल्यानंतर नक्की काय ते समोर येणार आहे. परंतु बाळाची पालकांनी काळजी घेतली पाहिजे, असे म्हटले जात आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)