Smriti Mandhana net worth: सांगलीची पोरगी टीम इंडियाची नवी कर्णधार, आता होतेय संपत्तीची चर्चा; एका मॅचचे किती पैसे घेते?

Smriti Mandhana net worth: सध्या संपूर्ण देशात महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाची चर्चा सुरु आहे. बीसीसायाने नुकताच तिला एकदिवसीय आणि टी-२० संघांची कर्णधार केले आहे. त्यानंतर आता तिच्या संपत्तीची चर्चा सुरु आहे.

| Updated on: Oct 07, 2026 | 10:12 AM
1 / 7
Smriti Mandhana net worth: नुकताच बीसीसीआयने सांगलीची लेक स्मृती मानधनाची एकदिवसीय आणि टी-२० संघांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद साजरा केला जात आहे. आता स्मृती मानधनाच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? चला जाणून घेऊया...

Smriti Mandhana net worth: नुकताच बीसीसीआयने सांगलीची लेक स्मृती मानधनाची एकदिवसीय आणि टी-२० संघांची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आनंद साजरा केला जात आहे. आता स्मृती मानधनाच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे. तिच्याकडे एकूण किती संपत्ती आहे? चला जाणून घेऊया...

2 / 7

स्मृती मानधाना महिला क्रिकेटच्या जगात खूप मोठे नाव आहे. तिच्या नावावर अनेक क्रिकेट रेकॉर्ड नोंदवले आहेत. अलीकडे तिने आरसीबीने डब्ल्यूपीएलचा दुसरा खिताब जिंकला. डाव्या हाताची स्फोटक ओपनर असलेल्या स्मृतीची संपत्ती सतत वाढत आहे.

3 / 7

भारतीय महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार स्मृती मानधना सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर लेफ्टी फलंदाज स्मृतीने क्रिकेटमधील सर्वात उत्कृष्ट फलंदाजांपैकी एक ठरली.

4 / 7

२०२६ मध्ये स्मृतीची संपत्ती सुमारे ३४ कोटी ते ४० कोटी रुपये असल्याचे बोलले जाते. सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट, लीग क्रिकेट आणि मोठ्या ब्रँड एंडॉर्समेंटमुळे तिची संपत्ती सतत वाढ आहे.

5 / 7

स्मृतीकडे बीसीसीआयचा ग्रेड ए कॉन्ट्रॅक्ट आहे. या करारानुसार तिला रिटेनर फी म्हणून वर्षाला ५० लाख रुपये मिळतात. याशिवाय तिला कसोटी सामन्यांसाठी १५ लाख रुपये, वनडे सामन्यांसाठी ६ लाख रुपये आणि टी२० सामन्यांसाठी ३ लाख रुपये मॅच फी मिळते. आता एकदिवसीय आणि टी-२० संघांची कर्णधार झाल्या नंतर तिच्या मानधनात बदल झाले असणार.

6 / 7

२९ वर्षीय स्मृतीने हुंडई, रेड बुल, नायकी, हीरो मोटोकॉर्प, गार्नियर, मास्टरकार्ड, हेवल्स, गल्फ ऑइल इंडिया, रॅंगलर, प्लेयर्सपॉट, नीम आयु, पीएनबी मेटलाइफ, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, रेक्सोना इंडिया आणि युनिसेफ इंडियासह अनेक ब्रँडचे एंडॉर्समेंट केले आहे.

7 / 7

अहवालानुसार तिच्या एंडॉर्समेंटमुळे होणारी कमाई प्रती डील ५० लाख ते ७५ लाख रुपये दरम्यान आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us