
भारतीय क्रिकेट महिला संघातील अव्वल खेळाडू आणि टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना हिच्यासाठी गेला महीना खूप खडतर होता. टीम इंडियाने महिला वर्ल्डकप जिंकल्यानंतर सगळेच आनंदात होते, स्मृतीसाठी तर हा आनंद दुहेरी असणार होता, कारण त्याच महिन्यात तिचं लग्न होतं. 23 नोव्हेंबरला स्मृती आणि संगीतकार पलाश मुच्छलचं लग्न होणार होतं, मात्र ते मोडलं. हे प्रकरण बरंच गाजलं, वादळ आलं, सोशल मीडियावर तर हा विषय प्रचंड चर्चिला गेला. पण काही दिवसांनी स्मृतीनेच समोर येत लग्न मोडल्याचं जाहीर केलं. (Photos : Social Media)

हा काळ तिच्य़ासाठी आणि कुटंबियांसाठी अतिशय कसोटीचा, खडतर होता. मात्र स्मृती त्यातून हळूहळल सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. लग्न मोडल्याचं जाहीर केल्यावर काहीच तासांनी एका इव्हेंटमध्ये जाहीररित्या दिसली. क्रिकेटपेक्षा जास्त मी कोणावरच प्रेम करू शकत नाही, असं म्हणते तिने हा खेळ आणि देश आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचं तिने नमूद केलं.

आता स्मृती पुन्हा एकदा सार्वजनिक कार्यक्रमाच्या मंचावर दिसली. तिने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. तेव्हाचा तिचा लूक, तिचा पेहराव, या सगळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पांढऱ्या रंगाचा वनपीस, चमचमणारे कानातले, चेहऱ्यावर आात्मविश्वास आणि ओठांवर तेच हास्य...अशा रूपातील स्मृती प्रचंड आकर्षक आणि तितकीच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर जुनं हास्य पाहून तिच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हे नक्कीच.

स्मृती मानधनाच्या चाहत्यांसाठी आणखी एक गुडन्यूज म्हणजे त्यांची ला़डकी खेळाडूती लवकरच पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. येत्या 21 तारखेपासून भारत वि श्रीलंका संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका होणार असून स्मृती पुन्हा त्याच जोशात खेळताना दिसणार आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी उत्सुकतेने वाट पहात आहेत.

तर त्यानंतर महिला प्रीमिअर लीगही सुरू होणार असून 9 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये स्मृती मानधना आरसीबी या संघाकडून खेळताना दिसणार आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच ठरणार आहे. पहिला सामना हा मुंबई वि. आरसीबी असा असून या सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना आमने-सामने येऊन जिंकण्यासाठी खेळणार आहेत.