
पावसाळा सुरु झाला की साप दिसण्याचं प्रमाण अधिक होतं. घराच्या कोपऱ्यात किंवा ओलसर माती असलेल्या भागात सापांचा वावर वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना सर्वाधिक असतात. त्यामुळे या काळात सावध राहणं आवश्यक असतं. पण या काळात साप बाहेर पडण्याचं कारण काय? (Photo: Meta)

पाऊस पडला की जमिनीतील ओलावा वाढतो. साप बिळात किंवा खड्ड्यात राहतात. बिळात किंवा खड्ड्यात पावसाचं पाणी साचतं. अशा परिस्थिती स्वत:ला वाचवण्यासाटी साप बाहेर पडतात. (Photo: Meta)

पावसाळ्यात सापांना सहज शिकार मिळते. कारण या ऋतूत कीटक, उंदीर आणि बेडूक हे प्राणी सक्रिय होतात. हे सापांचं भक्ष्य आहे. त्यामुळे अन्नासाठी साप बाहेर पडतात. (Photo: Meta)

पावसाळा हा सापांचा प्रजनन काळ देखील असते. पावसामुळे आर्द्रता वाढल्याने सापांच्या प्रजननसाठी योग्य काळ मानला जातो. त्यामुळे साप या काळात बाहेर दिसतात. (Photo: Meta)

पावसाळ्यात साप बाहेर पडल्याने ते घरातील कोपरा, माती, शेते आणि झाडांचा आसरा घेतात. झाडं झुडपात सर्वाधिक प्रमाणात राहतात. घरातील अडगळीच्या ठिकाणी साप राहतात. त्यामुळे या काळात सापांशी नकळत संपर्क आला किंवा पाय पडला तर चावण्याचं प्रमाण अधिक असते. (Photo: Meta)

साप घराच्या आसपास येऊ नये साठी घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा. आजूबाजूला असलेली गवतं आणि झुडपं कापा. कचरा किंवा घाण साचू देऊ नका. दरवाजा खिडक्या व्यवस्थित बंद करा. खिडक्यांना जाळी बसवून घ्या. जमिनीवर झोपणं टाळा. (Photo: Meta)