
सिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. सिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी दरम्यान सिमला युरोपीयन टाऊन सारख्या दिसत आहेत. बर्फानी झाकलेला मॉल रोड, रिज आणि क्राईस्ट चर्च विंटर वंडरलँड सारखा नजारा दिसत आहे. परंतू सिमलाची ट्रिप करताना प्लान करण्याआधी मार्ग आणि हवामानाची माहिती आधी घेणे गरजेचे आहे. ( Credit: himachal_pictures/Instagram)

किन्नौर त्याच्या नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील बर्फाने झाकलेल्या दऱ्या आणि स्वर्गासमान भासतात. सफरचंदाच्या बागा आणि लाकडांची पारंपारिक घरे आणि किन्नर कैलास पर्वतच्या बर्फाळ गिरीशिखरे या जागेला स्वर्ग बनवतात.येथील शांतता आणि ताजी हवा प्रसन्न करते. ट्रीप प्लान करण्याआधी सर्व माहिती घेऊन जावे. ( Credit: incredible_kinnaur/Instagram)

लाहौल-स्पीतीची खोरे थंडीत वेगळचे भासते.गोठलेल्या नद्या आणि बर्फाने झाकलेले बौद्ध मठ आणि सुनसान खोरे साहसी पर्यटकांना खुणावत असते. येथील थंडी मात्र जास्त गारठवणारी असते. त्यामुळे येथील नजारे आयुष्यभर लक्षात रहातात. हवामान आणि मार्गाची नीट माहिती करुन येथे पोहचावे लागते. ( Credit: Instagram)

चंबा हिवाळ्यात पोस्टकार्ड सारखे सुंदर दिसते. येथे प्राचीन मंदिर वास्तूकला आणि पारंपारिक हिमाचल घरे बर्फाच्या दुलई खाली लपली आहेत, त्यामुळे ती जास्तच मनमोहक दिसत आहेत. गर्दीपासून वेगळे असलेले चंबा शांतता आणि नैसर्गिक सौदर्यासाठी प्रसिद्ध आहे.(Credit: instayati/Instagram)

मनालीत देखील पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत. सोलंग व्हॅली आणि रोहतांग पास ( उघडल्यानंतर ) येथे बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. येथे स्कीईंग, स्नो स्कूटर आणि स्नोबोर्डिंग सारख्या एडव्हेंचरची मजा घेता येते. बर्फाने झाकलेले पर्वत आणि वाहणारी ब्यास नदी मनालीला जादुई लुक देत आहे. व्हेवी स्नोफॉल दरम्यान मनालीचे अनेक रस्ते बंद केले जातात. ( Credit: himachal_pictures/Instagram)