Solo Trip ला जाताय? या चुका करणे टाळा, अन्यथा…

अलीकडे सोलो ट्रिपला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. परंतु सोलो ट्रिपला जाताना काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमच्यासोबत विपरीत घडण्याची शक्यता आहे.

| Updated on: Nov 20, 2026 | 4:49 PM
1 / 5
सध्या सोलो ट्रिपला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. आता अनेक जण एकटेच फिरायला जाणे पसंत करतात.

सध्या सोलो ट्रिपला जाण्याचा ट्रेंड वाढला आहे. आता अनेक जण एकटेच फिरायला जाणे पसंत करतात.

2 / 5

तुम्ही पहिल्यांदा सोलो ट्रिपला जात असाल, तर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी काही चुका टाळल्या पाहिजे.

3 / 5

तुम्ही सोला ट्रिपसाठी निघालात, तर कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्ही कोणत्या खासगी हॉटेलमध्ये गेला, तर तुमच्या महागड्या वस्तू कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. रात्रीच्या वेळी निर्जनस्थळी फिरण्यापेक्षा गर्दीच्या ठिकाणी फिरावे.

4 / 5

तुम्ही सोलो ट्रिपवर जात असाल, तर तुमच्या प्रवासाविषयी कुटुंब आणि जवळच्या मित्रांना माहिती देत राहावी. दिवसभरातून किमान एकदा तुमच्या लोकेशनची माहिती द्यावी.

5 / 5

तुमच्याजवळ रोख रक्कम जास्त बाळगू नका. रोख रक्कमेच्या ऐवजी ऑनलाइन पेमेंटचा उपयोग करावा. फिरायला जाताना सुरक्षेला प्राधान्य द्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us