वडील असताना मुलाने चुकूनही करू नयेत या गोष्टी, एक चूक झाल्यास पडेल महागात!

घरातील वडील अजूनही हयात असतील तर मुलाने काही गोष्टी चुकूनही करू नयेत. वडील हयात असताना या गोष्टी केल्या तर मोठा अनर्थ होऊ शकतो, असे सांगितले जाते.

| Updated on: Feb 11, 2026 | 10:27 PM
1 / 5
भारतीय संस्कृतीत वडिलांचे स्थान हे सर्वोच्च आणि कोणत्याही इतर नात्याशी तुलना न होणार असते. घरातील वडील प्रत्येकाची जबाबदारी मोठ्या हिमतीने उचलतो. त्यामुळेच वडिसांसोबत भांडण केल्याने मुलाच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. हिंदू धर्मात वडील हयात असताना काही गोष्टी चुकूनही करू नयेत.

भारतीय संस्कृतीत वडिलांचे स्थान हे सर्वोच्च आणि कोणत्याही इतर नात्याशी तुलना न होणार असते. घरातील वडील प्रत्येकाची जबाबदारी मोठ्या हिमतीने उचलतो. त्यामुळेच वडिसांसोबत भांडण केल्याने मुलाच्या आयुष्यात अनेक संकटं येऊ शकतात. हिंदू धर्मात वडील हयात असताना काही गोष्टी चुकूनही करू नयेत.

2 / 5

हिंदू धर्मशास्त्रानुसार वडील जिवंत असताना मुलाने पिंडदान कधीच करू नये. कारण पूर्वजांशी निगडित असलेली सर्व कामे हयात असलेल्या वडिलांनीच केली पाहिजेत. वडील हयात असताना मुलगा पिंडदानासारखी कामे करत असेल तर मुलाला त्याचा तोटा होऊ शकतो.

3 / 5

वडील हयात असताना मुलाने घरातील मुख्य पूजा, मोठे यज्ञ कधीच स्वत: करू नये. अशा मोठ्या पूजेचा मान हा घरातील वडिलांचाच असतो. मुलाने उत्साहाने अशी कामे केल्यास त्याचा भविष्यात मोठा तोटा होऊ शकतो. वडील हयात असताना मुलाने दानधर्म, सामाजिक कामात स्वत:चेच नाव पुढे करणे टाळावे. दानधर्म, सामाजिक कामात पुढाकार घेण्याचा पहिला मान हा वडिलांचा असतो.

4 / 5

गाव-खेड्यात अजूनही वडीलधाऱ्या व्यक्तीलाच सामाजिक कामात मानाचे स्थान दिले जाते. वडील हयात नसतील तर मग मुलाचा विचार केला जातो. वडील काही सांगत असतील तर त्यांना चार-चौघात कधीच विरोध करू नये. सर्वांसमोर वडिलांना विरोध केल्यामुळे त्यांची प्रतीमा मलीन होते. त्यामुळेच मतभेद असले तरीही सामाजिक क्षेत्रात वडिलांचा सन्मान करायला हवा. मुलाने हा नियम नेहमी पाळला पाहिजे.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us