
सोनमचा गजब ड्रेस पाहून नेटकरी हैराण - बॉलिवूड डिवा सोनम कपूरने नुकताच तिच्या इंस्टाग्राम एकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सोनम कपूरने सफेद आणि काळ्या ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमुळे सोनम चांगलीच चर्चेत आली आहे.

ड्रेसवर बनलेल्या डिझाईवर खिळल्या सर्वांच्या नजरा - सोनमने परिधान केलेल्या या ड्रेसवर आसणाऱ्या डिझाईवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या ड्रेससोबतच सोनमने लावलेल्या लाल लिप्टिकमुळे तिच्या लुकमध्ये अजुनच भर पडली आहे.

फॅशन ट्रेन्डमुळे सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल - सोनमच्या या आउटफिटमुळे ती पुन्हा एकदी ट्रोल करण्यात आले आहे. काही नेटकरी तिला म्हणतात "तुला रात्री बघून लोक घबरूनचं जातील" तर दुसऱ्या एका युजरने सोनमची तुलना रणवीर सिंग सोबत केली आहे.

ती करत आहे वेगवेगळे प्रयोग - बॉलिवूड अभिनेत्री सोनम तिच्या लूकसोबत नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असते. मात्र तिने आता केलेल्या प्रयोगामुळे तिला ट्रोलींगला सामोरे जावे लागत आहे.

सोनमचे काम - वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनम कपूर 2019 मध्ये 'द जोया फॅक्टर' आणि 'एक लडकी को देख तो ऐसा लगा' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.