
'सोन परी' मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या फ्रुटी हिचं नाव तन्वी हेगडे असं आहे. आता तिच्यामध्ये फार मोठा बदल झाला आहे. तिला ओळखणं देखील कठीण झालं आहे. ती आता प्रचंड क्लासी आणि ग्लॅमरस दिसत आहे.

तन्वी हिचं करीयर फक्त 'सोन परी' मालिकेपर्यंत मर्यादित नव्हतं. तिने अनेक टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे, 'खिचडी', 'कॅप्टन हाऊस' आणि 'शाका लाका बूम बूम'मध्ये देखील काम केलं आहे.

टीव्ही व्यतिरिक्त, तन्वीने बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केलं. तिने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या पण संस्मरणीय भूमिका केल्या. आजही चाहते तिला विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत असतात.

तन्वी हिने 'चँपियन’, ‘पिता’, ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’, ‘शिवा’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. तिने सिनेमात साकारलेल्या सिनेमा देखील चाहत्यांना प्रचंड आवडल्या.

तन्वी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.