सोनू निगमच्या मुलाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फिटनेस पाहून टायगर श्रॉफसुद्धा भारावला

गायक सोनू निगमचा मुलगा निवान निगमची पहिली इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. एकेकाळी गुबगुबीत दिसणारा निवान आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

| Updated on: Mar 02, 2025 | 2:34 PM
1 / 6
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली आहेत. सोनूप्रमाणेच त्याचा मुलगा निवान निगमसुद्धा उत्तम गायक आहे. लहानपणापासूनच निवानने त्याच्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत गाणी गायली आहेत.

2 / 6
नुकतंच सोनू निगमने सोशल मीडियावर त्याच्या मुलाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. निवान केवळ गायनातच निपुण नाही तर त्याने त्याच्या तंदुरुस्तीवरही काम केलंय.

3 / 6
निवानने त्याच्या इन्स्टाग्रामवर ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. हेच फोटो शेअर करत सोनू निगमने अभिमान व्यक्त केला आहे. निवानने त्याचं वजन नियंत्रणात आणलं असून शरीरयष्टीकडेही पूर्ण लक्ष दिलं आहे.

4 / 6
निहानचा लूक आता पूर्णपणे बदलला आहे. एकेकाळी गुबगुबीत दिसणाऱ्या निवानने आता त्याचे सिक्स पॅक अॅब्स फ्लाँट केले आहेत. इन्स्टाग्रामवरील त्याची ही पहिलीच पोस्ट असून सोशल मीडियावर ती चांगलीच व्हायरल झाली आहे.

5 / 6
गेल्या दोन वर्षांत निवानने त्याच्या फिटनेसकडे पूर्ण लक्ष दिलं आहे. त्याच्या या फोटोंवर अभिनेता टायगर श्रॉफनेही कमेंट केली आहे. 'छान काम भाऊ', असं त्याने लिहिलंय. निवानच्या मेहनतीचं त्याच्या आईनेही कौतुक केलंय.

6 / 6
2011 मध्ये निवानच्या आवाजातील धनुषचं गाजलेलं 'व्हाय दिस कोलावेरी डी' हे गाणं तुफान व्हायरल झालं होतं.