सौरभ गांगुलीनं चांगली शाळा घेतली, मॅच ड्रॉ झाल्याने भारतीय संघाची दाखवून दिली चूक, ते 2 खेळाडू..
सोबतच टीम इंडियाच्या प्लेयर निवडीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कुलदीप यादव आणि मानव सुतार यांना संधी न मिळाल्याबद्दल गांगुली यांनी नाराजी व्यक्त केली. गांगुली यांनी सोशल मीडियावर आपले मत मांडले.

न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामना अनिर्णित (ड्रॉ) राहिल्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारतीय संघाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्लेन पीच असेल तेव्हा कसोटी सामने जिंकण्यासाठी चांगल्या स्पीनर्सची गरज असते, असं मत गांगुली यांनी व्यक्त केले.
सोबतच टीम इंडियाच्या प्लेयर निवडीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. कुलदीप यादव आणि मानव सुतार यांना संधी न मिळाल्याबद्दल गांगुली यांनी नाराजी व्यक्त केली. गांगुली यांनी सोशल मीडियावर आपले मत मांडले.
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी भारतीय फलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र, परदेशात कसोटी सामने जिंकायचे असतील, तर संघात चांगले फिरकीपटू असणे आवश्यक आहे, अस मत त्यांनी व्यक्त केले.
वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडू म्हणून उपयुक्त असला, तरी कुलदीप यादव किंवा मानव सुतार यांच्यासारख्या गोलंदाजांची कमतरता होती, असेही मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, कुलदीप यादव सुरुवातीला कसोटी संघाचा भाग होता. मात्र, दोन सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याच्या जागी अंशुल कंबोजला संघात स्थान देण्यात आले.
दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये तीन कसोटी सामन्यांत 23 विकेट घेणाऱ्या मानव सुतारलाही भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्यामुळे फिरकी गोलंदाजीसाठी भारताने अधिक पर्याय ठेवायला हवे होते, असा मुद्दा गांगुली यांच्या पोस्टनंतर उपस्थित झाला आहे.